🏠 स्वगृह
›
संत दालन
›
श्री योगानंद परमहंस
ॐ
॥ श्री योगानंद परमहंस ॥
श्री योगानंद परमहंस
ॐ
- योगानंद परमहंस, क्रियायोगाचा राजहंस
- कमल नयनी वेधक दृष्टी, बालवयातचि देवासाठी कष्टी
- तळमळ जाणुनि युक्तेश्वर भेटी, क्रियायोगाची दीक्षा थेटी
- लाहिरी अन् बाबाजी भेटी, अल्पावधितची परमेश्वर भेटी
- जाणुनि आज्ञा गुरुदेवांची, करी परदेशाची वारी
- पाश्यात्त्या ख्रिस्तासम वाटी, क्रिया योगाचा प्रसाद वाटी
- प्रेमाचा संदेश पसरविला, प्रवचनांत त्या जगा थेटी
- लिहिले योगी आत्मकथन अन्, जीवनातील वदले गोष्टी
- वाचुनिया वाचक ते होती, क्रियायोगाचे उत्सुक पोटी
- कार्य चालण्या पुढे अबाधित, ‘योगोदा’ संस्थापिती शेवटी
- महासमाधी घेउनियाही, देह राखिला योग्यासम कांति
- वर्णन करिता तन्मय झालो, वाचिता मज योगानंद भेटी
कृष्णदास
✦ ✦ ✦
॥ स्मरणे अर्पित सहजी निजस्थिती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆