🏠 स्वगृह
›
स्फुट-लेख
›
माता श्रीकुंडलिनी
ॐ
॥ माता श्रीकुंडलिनी ॥
माता श्रीकुंडलिनी
ॐ
- जय अंबे कुलकुंडलिनी शक्ति, मूलाधारी तुझी वस्ती
- विश्व उत्पत्ति स्थिति लय कर्ती, योगीजनांची माता चित्ती
- सर्परुपी ही तुझी आकृति, रक्तोत्पल असे तुझी कांति
- अखंड निद्रिस्त राहे भगवति, गुरुकृपेने उर्ध्व उठे ती
- उठता उर्ध्व भेदी चक्रां, हळुहळु उमलवि सार्या त्या कमळा
- वर्ण नाद ते वेगवेगळे
- मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत
- आज्ञा भेदुनि सहस्त्रारी धक्का, धक्क्याने सत्रावी उलथवी
- चंद्रामृते त्या देहा पोसवी, पिंड ब्रह्मांड ऐक्य घडवी
- जीवा शिवाचे मीलन घडवी, ब्रह्मानंदी अखंड बुडवी
- नाथाघरची उलटी खूण ही, गुरुकृपांकित सहजी अनुभवी
- द्वैताच्या त्या चालता वाटे, अद्वैतात सहजी पोहोचवी, अद्वैतात सहजी पोहोचवी!
कृष्णदास
✦ ✦ ✦
१
- ब्रह्मरंध्रातुनि प्रवेश करुनि शक्ति मूलाधारी निजली
- देहभावात रमणाऱ्या जीवा मग भूल तियेची पडली
- विषयानंदी रमता रमता अधोमुखी ती घसरली
- आत्मरुपापासुुनि जीवाला अत्यंत ती दुरावली
- करुणावंत सद्गुरूला दया जीवाची आली
- कृपाकटाक्षे क्षणात उर्ध्वमुखी तिज केली
- सर्पाकार सरपटत उर्ध्व चढू ती लागली
- चक्रभेद करीत हळुहळु ब्रह्मरंध्री पोहोचली
- नाभीपासोेनि ब्रह्मरंध्रात सोऽहंरुपे खेळली
- ब्रह्मरंध्री ते भान शिवाचे, एरव्ही जीवभावा ती रमली
- नादप्रकाश दर्शनि श्रवणी जीवा अत्यंत भावली
- साधनी रमता साधक मग ही खेळासम त्या गमली
- नाथाघरची उलटी खूण ही कृष्णदासे गुरुकृपे जाणिली
- ध्याना बैसता आले मना आजि म्हणुनि अशी ही वर्णिली!
✦ ✦ ✦
ॐ
- भगवंत निराकार | स्थानी वसे सहस्त्रार
- भेटण्यासी देहात | सुषुम्नेचे महाद्वार
- गुरुकृपे उघडे ते | प्रवासाचेराजद्वार
- मूलाधार सहस्त्रार | श्वास उठे वारंवार
- ध्यानी तो घेताचि | एकाग्रे एकवार
- साक्षित्व घडे त्याचे | सहजीच वारंवार
- उलटवोनि हुंकार | खेचिताचि सकार
- सरसरसर चढे वायू | ब्रह्मरंध्री सहस्त्रार
- निरालंब निराधार | भान तेथ महदाकार
- स्थल काल ना विकार | नुरे तेथ अन्यविचार
- कृष्णदास तेचि स्थळी | जाहला तदाकार!
✦ ✦ ✦
॥ हास्य लोभस चिद्घन कांती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆