[ रचनाकार:- कृष्णदास ]
श्रीस्वामीजींच्या प्रेरणेने व कृपेने हे छोटेसे ओवीबद्ध चरित्र लिहिले गेले आहे. भारतीय वा महाराष्ट्रीय संतपरंपरेत श्रीस्वामीजींचे स्थान, भक्त, योगी व ज्ञानी या तिन्ही अंगाने विचार करता, अतिशय उच्च आहे व त्याच वेळी त्यांचे जीवन सर्व मुमुक्षु, साधक व सिद्धांनाही अतिशय आदर्श व प्रेरणादायी असे आहे. जन्मत:च सिद्ध वा विदेही सत्पुरुषांचे लीलाचरित्र सर्वसामान्यांस त्यादृष्टीने उपयोगी वा प्रेरणादायी ठरत नाही. पण श्रीस्वामीजींसारखे संत आपल्या आदर्श जीवनाने सर्वांना दीपस्तभांसारखे निरतंर दिशा-दिग्दर्शन करीत असतात व त्याच वेळी आपल्या तपस्यार्जित प्रचंड सामर्थ्याने भक्तांचा, शरणागतांचा सर्वकाळ सांभाळ व उन्नत्ति करीत असतात. श्रीस्वामीजींसारख्या थोर संताचा सर्व जीवनलेख आवाक्यात येणे महत्कठीणच. श्रीस्वामीजींद्वारे सहजच असंख्य चमत्कार घडले परंतु ते वगळून वास्तव, रसाळ व बोधपूर्ण अशा हेतूने लिहिलेले चरित्र, त्यांतील चमत्कार वगळता, त्यांचे साधकावस्थेतील ईेशरीय निदिध्यासाने व गुरुभक्ति, गुरुनिष्ठा यांनी नटलेले अकृत्रिम जीवन तसेच परमपदप्राप्तीनंतर त्यांनी दिलेला बोध याचे चिंतन झाले तर ते साधकीय जीवनांत सर्वांना अतिशय उपयुक्त ठरेलच यात शंकाच नाही.
— कृष्णदास
॥ हास्य लोभस चिद्घन कांती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆