ॐ
॥ श्री सारदामाता ॥
श्री सारदामाता
ॐ
- बंगालची सारदामाता, रामकृष्णांची लीला सहचारिणी
- त्यांच्या सर्व भक्तगणांची, असे ती भवतारिणी
- रामकृष्ण मुखी माता माता, असे ती त्यांची काली माता
- तेवि त्यांच्या भक्तगणांची, असे की ही सारदामाता
- मातेहुनि प्रेम अन् छाया, वाटी ती त्यां भक्तगणा
- पवित्र जीवन त्यांचे देई, आदर्श अन् स्फूर्ति नवी
- आधारचि तो केवळ त्यांचा, विवेकानंद अमेरिका गाजवी
- जीवन जगली साधे केवळ, पण असेचि ते दिव्य अति
- बालक मी तो त्यांचे कुशीत, खेळतो मौज अति
कृष्णदास
✦ ✦ ✦
My Website
॥ सिंहासनीस्थित वामन मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆