🏠 स्वगृह
›
संत दालन
›
श्री नरसिंह सरस्वती
१
- आळंदीसी नरसिंह सरस्वती यति, कांति जशी नवबालक अति
- विलोभनीय हास्य मुखावरी, आजानुबाहु असे ती मूर्ती
- नौली धौती क्रिया जाणती, योगाभ्यासी पारंगत अति
- कुणासी नाही ठावठिकाणा, कोठून अवतरले ये क्षिती
- अलंकापुरी आले वसति, जाणूनिया माऊलीची महति
- जरी अस्खलित संकृत वाणी, समर्थ आदेशी प्राकृत बोलती
- माऊलीवरी भाव तो अचाट, दर्शना जाता मुर्च्छित होती
- माऊलीवरी प्रेम ते आगळे, यात्रेत रथ ते स्वत: ओढीती
- दत्त संप्रदायी असे हे यति, कार्य त्यांचे अति गूढ, कुणीही न जाणती
- इंद्रायणीतीरी त्यांची असे समाधी, दर्शना जातां भक्त कृपा अनुभवती
✦ ✦ ✦
२
- आळंदीचे स्वामी यति, मूर्ति असे नामी अति
- बाल हास्ये मुखी शोभती, श्री विठ्ठल मुखी गाती
- योगी तरीही भक्त अति, माऊलीप्रति प्रेम किती
- चमत्कारांना नाही गणती, कृष्णदास दर्शन इच्छिती
✦ ✦ ✦
३
- आळंदीचे स्वामी गाती श्री विठ्ठल
- भक्तांसी उपदेश मंत्र श्री विठ्ठल
- नाम ऐकता दंग होई श्री विठ्ठल
- कृष्णदास नामी रंगे श्री विठ्ठल
✦ ✦ ✦
४
- श्री विठ्ठल श्री विठ्ठल,फाडी अज्ञानपटल
- आळंदीचे स्वामी, उपदेशिती श्री विठ्ठल
- योगाचे ते ज्ञान, देई श्री विठ्ठल
- भक्तिप्रेमसुुखही, देई श्री विठ्ठल
- भक्तियोगयुत मंत्र, आहे श्री विठ्ठल
- कृष्णदास गाता, नाचे श्री विठ्ठल
✦ ✦ ✦
५
- गाता श्री विठ्ठल, तो अचाट लक्ष्मीनारायण
- श्री नाम ते लक्ष्मी, अन् विठ्ठल नारायण
- दोहोसहित असे, नाम श्री विठ्ठल
- शिवशक्ति बीज, नाम श्री विठ्ठल
- अगाध सामर्थ्य वसे, नामे श्री विठ्ठल
- कृष्णदास सांगे, देई भुक्तिमुक्ति सहज
✦ ✦ ✦
६
- स्वामी नरसिंव्ह सरस्वती, मुखी हास्य सांगो किती
- पाहताती प्रसन्न चित्ती, देखिताची धन्य अति
- पवित्र शांत गूढ अति, मठ भरला भावतो अति
- कृष्णदास अर्पितो भावे अति, स्वामी मिरविती हार गळयाप्रति
- पाहोनिया वाटे सांगो किती, धन्य धन्य डोळयांप्रति
✦ ✦ ✦
७
- आळंदीचे स्वामी, मूर्ति आजानुबाहू
- प्रसन्न नेत्र मुखकमली, हास्य किती हे पाहू
- कांति मृदु अति कोमल, बालक जणू की पाहू
- भोजना बैसता घालिती, राघू बोक्या जेवू
- उच्च कोटीचे योगी परि, महति किती हो पाहू
- तुळसी माळ त्या कंठी, शोभे अति हे पाहू
- टोपी कफनी लुंगी, रुप मनोहर पाहू
- कृष्णदास म्हणे, स्वामीचरणी नत या होऊ
✦ ✦ ✦
॥ दत्तात्रेयगुरु यति त्रिमूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆