🏠 स्वगृह
›
संत दालन
›
भगवान श्री रमण महर्षि
ॐ
॥ भगवान श्री रमण महर्षि ॥
भगवान श्री रमण महर्षि
ॐ
- अरुणाचलचे रमण महर्षी, नजर प्रेमळ हृदया स्पर्शी
- या युगाचे मौनी ऋषी, दर्शन होता अति मी हर्षी
- वस्त्रचि केवळ ते लंगोटी, शुभ्र उपरणे खांद्यावरती
- सवे कमंडलु आणि काठी, अरुणाचलावरी ये जा करिती
- दर्शना लोक दुरदुरुनी येती, ‘मी कोण ते शोध’ उपदेशिती
- दृष्टी पडता एकचि क्षणी, अद्वैताची पटविती खूणी
- जीवभाव हो त्यांचा फिटला, आत्मभावे संपूर्णचि नटला
- पाहता त्यांना विचार खुंटला, आत्मभाव परी स्पर्श दाटला
- अरुणाचलचा शिव तो भासला, नमन मी करिता अति मंद हासला!
कृष्णदास
✦ ✦ ✦
ॐ
- ‘मी कोण?, मी कोण?’, शोधा म्हणती श्री रमण ॥
- विचार स्फुरती नित्य अंतरी, जाणविती ‘ज्या’ तो कोण?,
- शोधा म्हणती श्री रमण ॥
- उदय विश्व ये ‘मी’ पण स्फुरता, मावळता ‘मी’ उरतो तो कोण?,
- शोधा म्हणती श्री रमण ॥
- देहचि मी मी म्हणणे हे हो अज्ञान लक्षण
- देह नव्हे मी शाश्वत आत्मा, ही ज्ञानाची खूण त्यासी,
- शोधा म्हणती श्री रमण ॥
- विचार स्फुरती मागोवा त्या घेता प्रतिक्षण
- झरा आटता विचारा त्या येई हो मरण, नाश विचारा नाश मनाचा, उरते आत्म्याचे स्फुरण,
- जाणा म्हणती श्री रमण ॥
- सत्चित्सुखमय आत्मा तू गा पराशांती ठाण
- देह जरी तव निराकार तू आत्मा निर्गुण
- जाणा म्हणती श्री रमण ॥
- श्री रमणाश्रमा भेट देता, भगवानांची दृष्टी पडता,
- अंगी बाणेल हो खूण, तेथ कृपेची खाण
- कृष्णदास हा भेटी होता, दर्शनी आनंदा उधाण,
- कृपा करती श्री रमण ॥
✦ ✦ ✦
॥ सिंहासनीस्थित वामन मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆