🏠 स्वगृह
›
संत दालन
›
श्री जे. कृष्णमूर्ती
ॐ
॥ श्री जे. कृष्णमूर्ती ॥
श्री जे. कृष्णमूर्ती
श्री जे. कृष्णमूर्ती
- जे. कृष्णमूर्ती भारतभूचे तत्वज्ञानी संत,
- जीवन जगण्या देती नवी दृष्टी अन् मंत्र
- हास्य त्यांचे असे निखळ बालकापरी, आवडती त्यांसी बालके भारी
- टापटीप शिस्त अन् नेटकेपणा, असेचि केवळ वाखाणण्यापरी
- हस्तस्पर्शाने व्याधी हरवी, किमया करिती जादुपरी
- कुणीही न गुरु अन् कुणीही तो चेला, मार्ग आक्रमा आपआपुला
- प्रवचनांतुनी नित्य पसरविला, संदेश हा आपुला भला
- वाणी न केवळ ‘परा’वाणी, ‘जागृत’ करिती श्रोतृगणी
- ‘केवळ’ दृष्टी अर्पिती श्रोत्यां, जीवन करण्या दिव्यगुणी
- नमस्कार त्यांना कधीही नावडे, जाणुनि मी करतो मनोमनी
- आशीर्वादे जीवन माझे, जगणे होते दिव्यपणी
✦ ✦ ✦
॥ हास्य लोभस चिद्घन कांती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆