🏠 स्वगृह
›
संत दालन
›
श्री रामानंद बीडकर
ॐ
- अत्तराचे व्यापारी, झाले संत अधिकारी
- कथा बीडकर महाराजांची, ऐका सारे तुम्ही न्यारी
- रामानंद नाव त्यांचे, विषयानंदी रमले साचे
- छंद नाना असती त्यांचे, नाच गाणे इत्यादींचे
- एकदा त्यांना कुणीतरी टोचे, अंतर दुखता मनी बोचे
- स्वाभिमान तो उफाळुनी, निश्चय मनी झाला त्यांचे
- प्रयत्नांती परमेश्वर, मनी त्यांचे बाणली खूण
- निरसुनि टाकी सर्व अवगुण, शोधुया गुरु आपण
- अक्कलकोटी तो सापडला, स्वामी समर्थे हाती धरला
- दृष्टीक्षेपे शक्तिपात करुनी, ध्यानमार्गाची दीक्षा लाधला
- रात्रंदिन तो शेंडी बांधुनी, कठोर ध्यानाभ्यास केला
- पूर्ण होता अंतरी तो, समर्थ कृपे फळा आला
- विषयानंदी रामानंद, ब्रह्मानंदी डोलू लागला
- गुरुदर्शना जाता मग गुरुने, अंतिम फास सोडविला
- गुरुदक्षिणा म्हणुनी बाधक, किमयेचा त्याग करविला
- पावन करण्या अनंत जनांसी, नर्मदा परिक्रमाही करविली
- पुण्यनगरीतील पुण्यपुरुषाची, मी ही अशी कथा वर्णिली
- रामभक्त तुलसीदासासम, मज त्यांची ही कथा गमली
- समर्थ गुरुने हाती धरता, घडली ही किमया वर्णिली
- रामानंदी चरणांवर त्या, आत्मानंदी मी डोई ठेविली
कृष्णदास
✦ ✦ ✦
॥ भक्तपालक दायक मुक्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆