🏠 स्वगृह
›
तीर्थक्षेत्र
›
श्रीक्षेत्र गिरनार
ॐ
॥ श्रीक्षेत्र गिरनार ॥
श्रीक्षेत्र गिरनार
ॐ
- वाट चाललो गिरनारीची, दशसहस्त्र त्या पथवाटेची
- पदी पदी आठव त्या दत्ताची, दत्तगुरुंची दत्तगुरुंची
- जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी ॥
- प्रथम ओलांडली मी तीन शिखरे, काम क्रोध लोभ ही खरे, दिसू लागली मग गुरुचरणे
- लगबग लगबग वरती गेलो, पवित्र मंगल चरणांवरी त्या, मस्तक ठेवुनी, धन्य मी झालो, धन्य मी झालो ॥
- भानावरती मग मी येता, समजुनी चुकलो मी हा पुरता, केवळ दत्तकृपेने मी हो, शिखर ते चढलो, शिखर ते चढलो ॥
- त्या शिखरी हो प्रचंड वारा, त्या शिखरी हो प्रचंड वारा, गुरुकृपेचा तो हा सारा, त्या वार्याने मी पण माझे, कधी उडविले मज नच कळले
- वाटे माझे तप अजि फळले, वाटे माझे तप अजि फळले
- दत्ताच्या ह्या दरबारी अजि, कधी पोहोचले, ते नच कळले
- दत्ताच्या ह्या दरबारी अजि, मी रुजु झाले, रुजु मी झाले!
कृष्णदास
✦ ✦ ✦
ॐ
- धावा धावाऽऽ गिरीनारीच्या देवाऽऽ, धावा धावाऽऽ गिरीनारीच्या देवाऽऽ ॥
- निराकार तू सर्वदेशी परी रूप सगुण मज दावा
- सुहास्य सुंदर रुप मनोहर नयनांसी मम दावा ॥
- भावभक्तिच्या उत्तुंग शिखरी निवास तुझा मज ठावा
- झुरता निशिदिनी तुजसाठी या जीवा कधी न विसावा ॥
- दर्शनासी आळविता अश्रूंचा पाट किती मी वहावा
- कृपाळू दिनवत्सल नाम तव कृपेची प्रचित मजसी दावा ॥
- त्रिशूल डमरू घेवुनि हाती, चालता, पायी वाजती खडावा
- कामधेनू अन् श्वान संगे तू डुल्लतसे आत्मभावा॥
- कामक्रोध षडरिपूंचा जाळीतसे मज वणवा
- कृपाळू तव द्वारी आलो ऐकुनि तव कृपेचा गवगवा ॥
- भक्ती ज्ञान वैराग्याच्या अर्पी मज तव विभवा
- वैराग्याच्या अखंड धुनीत भस्मीभूत करी गा देहभावा ॥
- आर्तस्वरे आळविता तुजसी अश्रूंसी कधिचि ना तो विसावा
- साधनेच्या दुर्गम पथवाटे पदीपदी आठव तुझाचि व्हावा ॥
- कृपा कृपा तव कृपाचि केवळ, त्याविना उध्दार ना तो जीवा
- कृपांकित तव अगणित भक्तांचा वाटतसे मज हेवा ॥
- सर्वसाक्षी तू अंतरीच्या मम जाणी तळमळी अन् भावा
- शरणागत मी तुज सर्वथा स्वीकारी नमस्कार मनोभावा ॥
- गिरिराज गिरनार पर्वती, गुरुराजाच्या भेटीसाठी, आशा बहु या जीवा
- स्मर्तुगामी श्री दत्तप्रभु हो प्रगट तुम्ही हो व्हा व्हा ॥
- श्री दत्तगुरु तू गुरु गुरुंचा गुरुराज मार्ग मज दाखवा
- नित आनंदी त्या ब्रह्मानंदी तुम्हासंगे डोलवा ॥
- भाव मनींचा मम अति शुद्ध जाणुनिया प्रभु धावा
- पावा पावा दयाळू प्रभु तू प्रार्थनेसी या पावा ॥
- कृष्णदास हा अति तळमळुनि करितसे तव धावा
- जाणुनि ऐकुनि तळमळ दासाची या त्वरित प्रभु या धावा ॥
कृष्णदास
✦ ✦ ✦
ॐ
- आला आला दत्त अवधूत, आला आला दत्त अवधूत
- पायी खडावा गर्जत, आला आला दत्त अवधूत
- त्रिशूल डमरू दो हातात, शंख चक्र ते दुज्या करांत
- कमंडलू तो वाम करात, अन् जपमाळा सव्य करात
- आला आला दत्त अवधूत, आला आला दत्त अवधूत
- माळ रुद्राक्ष शोभे गळ्यात, जटाभार शोभे शिरात
- आला आला दत्त अवधूत
- अखंड धुनीचे भस्म तनावरी, व्याघ्रचर्म ते असे कटिवरी
- कृपाळू नेत्र, हास्य मुखावरी, ध्यान दिसे ते अति सुंदरी
- चढता पर्वत हा गिरनारी, दर्शन अवधूत होय वाटेवरी
- जय गिरनारी, जय गिरनारी, मुखी गा हो करता वारी
- कृष्णदासही करता वारी, दर्शनाची इच्छा भारी
- मुखी गातो जय गिरनारी, जय गिरनारी जय गिरनारी
कृष्णदास
✦ ✦ ✦
॥ समर्थस्वामीगुरु अभेदमूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆