[ रचनाकार:- कृष्णदास ]
अध्यात्ममार्गातील अनुभूति हे केवळ अन् केवळ श्रीसद्गुरुंच्या कृपादानाचे फलित आहे. ही कृपा कुणावर, कशी व केव्हा होईल त्याचे काहीच गणित नाही. कर्तुम-अकर्तुम-अन्यथाकर्तुम असे सामर्थ्य बाळगणारे श्रीसद्गुरु पात्रापात्रतेची गणना न करता जीवावर अनुग्रह करतात व जीवाची साधकीय जीवनाची वाटचाल सुरु होते. साधनेची पराकाष्ठा करताना स्वत:च्या मर्यादांची जाण पटून साधक जेव्हा श्रीसद्गुरुंशी अनन्य-शरणागत होतो तेव्हाच या कृपेचे बीज उमलू लागते. अचल गुरुनिष्ठा व अहेतुक गुरुप्रेम यांत क्षणाक्षणाने व कणाकणाने वृद्धि होता होता, त्यांची परिसीमा गाठताच, साधक दिव्य अनुभूतीस पात्र होतो. या वाटचालीत श्रीसद्गुरु लीलाचरित्र गुणगान व चिंतन यांचे स्थान अनमोल आहे. ‘श्रीदत्तचरित्रगुटिका' हे परमसद्गुरु श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे ओवीबद्ध संक्षिप्त चरित्र व ‘चित्-स्फुर्ति चिंतनामृत' यांचे वाचन व चिंतन-मनन, श्रीदत्त महाराजांच्या कृपेने साधकांस परतत्वाचा स्पर्श घडवेल असा विश्वास आहे.
— कृष्णदास
॥ हास्य लोभस चिद्घन कांती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆