🏠 स्वगृह
›
संत दालन
›
अवतार श्री मेहेर बाबा
ॐ
॥ अवतार श्री मेहेर बाबा ॥
अवतार श्री मेहेर बाबा
श्री मेहेर बाबा मौनी मुनी
- श्री मेहेर बाबा मौनी मुनी
- मौनातुनी क्रांती घडविण्या, अवतार तो भारतभूमी
- कृपा त्यावरी अनेक संती केली असे ती ऐका तुम्ही,
- बाबाजान, साईबाबा, उपासनी, ताजुद्दीन अन् केडगावी नारायणी
- साक्षात्कारे ज्ञान हे होता, घेती मौन, आज्ञा अंतरातुनी
- प्रेमाचा संदेश पसरविला केवळ प्रेमळ नेत्रांतुनि
- सेवा केली स्वहस्ते त्या मस्त अन् दीनदुबळ्यांची
- प्रयोग केला नवजीवनाचा देण्या शिष्यांना शिकवण साची
- प्रवास केला जगभर अन् जागोजागी भक्तगण हो गुणी
- समाधी घेती मेहराबादी, मी नमितो त्यांसी नि:शब्दातुनि
कृष्णदास
✦ ✦ ✦
॥ षडरिपुनाशक हारक भवभीती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆