🏠 स्वगृह
›
संत दालन
›
भगवान श्री नित्यानंद
ॐ
॥ भगवान श्री नित्यानंद ॥
भगवान श्री नित्यानंद
ॐ
- केरळचे स्वामी नित्यानंद, स्थिति अखंड नित्यानंद
- देवी भगवती वज्रेश्वरीजवळी, गणेशपुरी निवास अखंड
- कैलाशकुटीरी निवास त्यांचा, वाटे शिवचि कैलाचा
- वर्ण ही त्यांचा काळाकभिन्न, वाटे प्याला जणू तो पेला विषाचा
- अवधूताची केवल स्थिति ती, निराकार साकारली ती
- आत्मानंदी चालणे झपझप, बोलणे अति अल्प असेेचि
- बाळ गोपाळ फार आवडे, संगती त्यांच्या रमती फार
- आत्मानंदी अवधूत योग्या, दर्शना जमती भक्त अपार
- फळा-फुलांचा ढीग समोर, करिती ना दृष्टी त्यापुढे
- भक्त कल्याणा मात्र ठेवती, अविरत दृष्टी त्यांजकडे
- एकचि दृष्टी पडता मात्र, शांभवी दीक्षा अर्पितसे
- कूर्मदृष्टीने अखंड त्यांना, जन्मांतरी पोशितसे
- देह त्यागिता जागृत अद्यापि, नमस्कारिता मज पाहतसे
- अवधूताच्या ह्या शिष्याला, प्रेम अखंड अर्पितसे
कृष्णदास
✦ ✦ ✦
॥ श्रीपादवल्लभ नृसिंह सरस्वती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆