ॐ
॥ श्री दादा गावंड ॥
श्री दादा गावंड
ॐ
- दादाजींचा संवाद येई अंतरातून,
- मनाविरहित अशा शुद्ध जाणिवेतून
- परमेशचि बोले त्यांच्या मुखातून,
- बोल उमटती ते प्रतिभेच्या स्त्रोतातून
- साध्या सुंदर सुलभ रसाळ भाषेतून,
- नाश करा मनाचा सार उपदेशातून
- अंतरीच वसे परमेश पाहा डोकावून,
- कालातीत शाश्वत अवस्था घ्या रे सर्व जाणून
- तेचि विश्व नित्यनूतन दिसेल तुम्हालागून,
- अंतरीच स्वानंदाचा अनुभव येईल फुलुन
- करा करा अभ्यास ही खूण ओळखून,
- कृष्णदास म्हणे जीवन सार्थक परमेश्वरी कृपेतून
✦ ✦ ✦
॥ श्रीपादवल्लभ नृसिंह सरस्वती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆