ॐ
॥ श्रीसद्गुरूप्रेमरस ॥
श्रीसद्गुरूप्रेमरस
१
- नाही नाही नाही देवा नाही दुजी आस
- देई देई देवा मज तव प्रेमरस
- तुजसाठी केला पहा संसाराचा नाश
- लौकिकाची सारी पहा सोडलीसे आस
- सोऽहं श्वास घेतो परी ना जाई गगनास
- अहम् भाव काही केल्या ना जाई विलयास
- मिटवोनि टाकी देवा सारा द्वैताभास
- अद्वैतावरील भक्तीची एक कृष्णदासा आस
✦ ✦ ✦
२
- सद्गुरुप्रेमरस, नाहीऽऽ जीवा दुजी आसऽऽ
- सद्गुरुदर्शनाचा ध्यासऽऽ, मजऽऽ लागो दो नयनासऽऽ
- सद्गुरुचरण स्पर्शासऽऽ, उतावीळ या कायेसऽऽ
- कर्ण उतावीळ नित्यासऽऽ, सद्गुरुऽऽ मंजुळ वाणीसऽऽ
- सद्गुरु अवीट नामासऽऽ, चाखायाऽऽ जिव्हेसी या आसऽऽ
- घ्राणी चालावा अखंडऽऽ, सद्गुरुंचाचि सोऽहं श्वासऽऽ
- पिउनि प्रेमरस ऐसा, लागोऽऽ सद्गुरुचाचि ध्यासऽऽ
- कृष्ण सरस्वती दत्तासऽऽ, विनवितो कृष्णदासऽऽ
✦ ✦ ✦
३
- सद्गुरुमाये पाजिता प्रेमरस
- विसरला जीव विषयरस
- दृष्टीपुढे माय ना देखे आणिकास
- स्थितिस या पावला आज कृष्णदास
✦ ✦ ✦
४
- सद्गुरुप्रेमरस गोडी वर्णू काय
- पिता पिता प्रेमभावे देहभाव जाय
- वृत्ती शमुनिया एकाकार होय
- कृष्णदास दृष्टीपुढे नित सद्गुरुमाय
✦ ✦ ✦
५
- सद्गुरुप्रेमरस, कैसा रस असे खास
- नाही स्थूल रुप त्यास परी, गोडी कळे सर्वांगास
- पंचज्ञानेंद्रियासी, नुरे इतर काही ध्यास
- पिता रस घेतला त्याने, कृष्णदासाचाचि घास!
✦ ✦ ✦
६
- सद्गुरुप्रेमरस, पिण्या जरी होई आस
- गोडी तिची संसाराचा, करी सर्वथाचि विनाश
- तोडोनिया विषयफास, स्वरुपाचा लावी ध्यास
- करे अहंचा विनाश, सेवणारा होई बेहोश
- पिऊनिया प्रेमरस, कृष्णदास मदहोश!
✦ ✦ ✦
७
- सद्गुरुप्रेमरस, लक्षण त्याचे असे खास
- पितो जरी दास, हर्ष होतो सद्गुरुस
- करमेना एकल्यास, म्हणुनि झाला द्वैताभास
- स्वत:सीच भेटण्यासी, स्वत:लाच आस
- द्वैतातेत्या मिटविण्या, पान्हा फुटे सद्गुरुस
- दासासी त्या पाजितसे, थोडा थोडा प्रेमरस
- सेविता तो हळूहळू, भिने दासा सर्वांगास
- द्वैतातुनि नेतसेतो,गुरु-दासा अद्वैतास
- प्रेमरस गुरुपूर्ण, दास पूर्णप्रेमरस
- रसानेच सेवावा रस, ऐसी घडे क्रीडा खास
- रमता रमता या क्रीडेस, मूक झाला कृष्णदास!
✦ ✦ ✦
८
- सद्गुरुप्रेमरस, पिऊनिया झालो धुंद
- वर्तता मी जनी वनी, अखंडचि हो आनंद
- हृदयी मज सद्गुरुने, रोविलासे जो कृपाकंद
- उमलोनि व्यापुनिया, राहिलासे तो सर्वांग
- पाझरतो त्यातुनिया, प्रेमरस अविरत
- कृष्णदास सेवितसे, राही त्यातचि डुंबत
✦ ✦ ✦
९
- सद्गुरुप्रेमरस, त्याची गोडी अति खास
- कोण विचारतो शक्तीस, सेविता परमरसास
- शक्ती मागे ‘स्व’ भानास, पिता झाले जे नि:शेष
- नाही शक्तीची ती आस, प्रेममग्न कृष्णदास
✦ ✦ ✦
१०
- सद्गुरुप्रेमरस गोडी, सेवी तू आवडी, जीवा सेवी तू आवडी
- सुखे सर्वचि थोकडी, त्यापुढे सर्वचि थोकडी
- ना वर्णिता ये गोडी, ना अमृत त्या तोडी
- तुटे जन्ममरण बेडी, करी जीवासी ती वेडी
- कृष्णदास चाखितसे, आवडी ती गोडी
✦ ✦ ✦
११
- पहा अमुच्या पावसी कैसा मिळे प्रेमरस
- काय गोडी वर्णू त्याची ना शब्द वर्णायास
- सेविताचि नुरे काही मनासी या आस
- प्रेमधुंदी चढोनिया विरे जगद्भास
- देव तोचि तोचि भक्त येई अनुभवास
- स्वरुपासी मिठी देता सद्गदित कृष्णदास!
✦ ✦ ✦
१२
- सद्गुरुप्रेमरस जहर जहाल
- जो पीवत एक बार होत बेहाल
- मिटाकर खुद को करे खुशहाल
- खुदा बनाकर छोडे ये ही सद्गुरुका कमाल
- कृष्णदास पीकर हो गया मालामाल!
✦ ✦ ✦
॥ करवीरग्रामी अवतरले यति, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆