f
स्व-स्वरूप
॥ श्री सद्गुरुनाथाय नम: ॥
प्रश्न: स्व-स्वरूपापासून बहिर्मुख होणे म्हणजे काय व ते कसे होते?
सर्वप्रथम स्व-स्वरूप म्हणजे काय याचा विचार केला पाहिजे. त्याबद्दलची संकल्पना स्पष्ट झाली पाहिजे. आत्म्याचे वा परमात्म्याचे सच्चिदानंद स्वरूप तेच जीवाचे स्वत:चे मूळ स्वरूप अथवा स्व-स्वरूप होय. जीवाने ते अनुभवणे म्हणजेच स्व-स्वरूपानुभूति होणे व त्यांत स्थिर होऊन ती नित्यावस्था होणे हे सिद्धावस्थेचे लक्षण म्हटले जाते.
बहिर्मुख ‘व्हावे' लागत नाही. सर्वसामान्य जीव हा नित्य बहिर्मुखच असतो!
प्रश्न: ब्रह्मानुसंधान म्हणजे काय?
सर्वसाधारण व्यवहारातील उदाहरण द्यायचे म्हणजे एखादा भुंगा फुलावर बसून मधुपान सुरु करण्याच्या केवळ क्षणापूर्वी त्याची जी स्थिती असते ती स्वस्वरूपी अनुसंधानाचे वा ब्रह्मानुसंधानाचे वर्णनादाखल देता येईल. (मात्र तो मध चाखत असताना केवळ आनंद घेण्याची स्थिती असते, ते अनुसंधान नव्हे). आनंद भोगत असताना तेथे भोग्य-भोक्ता-भोक्तृत्व ही त्रिपुटी अस्तित्वात नाही. यांस केवल-स्थिति असेही म्हणतात.
यांत एक गोष्ट अतिशय आवश्यक आहे ती म्हणजे भुंग्याने केव्हातरी मध चाखला असला पहिजे, तरच त्याची गोडी अनुभवली असल्याने ती परत परत चाखावी असे त्याला वाटेल.
याच प्रकारे स्व-स्वरूप किंवा ब्रह्मानुभवाचे बाबतीत लागू आहे. जर तो अनुभव सद्गुरुने दीक्षा देताना दिला असेल किंवा साधनाकालात लाभला असेल तरच, केवळ तरच साधक त्याकडे परत परत आकृष्ट होईल किंवा त्याचे अनुसंधान स्वाभाविकरित्या, आपसूकच घडेलच घडेल.
वरील व्यावहारिक उदाहरणात एका अत्यंत मूलभूत आणि महत्वाचा फरक आहे तो म्हणजे भुंगा सेवन करीत असलेला आनंद हा मधाचा स्वाद अर्थात् पंचविषयांपैकी (शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध) रस विषयाने प्राप्त झालेला आहे, तर स्व-स्वरूपानंद हा या पंचविषयापैकी एखादा, एकपेक्षा अधिक किंवा सर्व विषय प्राप्त झाल्याने होत नसून वा त्यांचेवर अवलंबून नाही, तर तो निरालंब आहे.
अत्यंत मूलभूत विचार करायचा झाल्यास - भुंग्यास मध प्राशन करताना (किंवा कोणत्याही जीवास कोणताही विषय सेवन करताना) जो आनंद लाभतो तो, त्या त्या पदार्थसेवनाने लाभतो हा एक सर्वात मोठा भ्रम आहे. वास्तविकरित्या आनंदी स्थिति ही जीवाची मूळ स्वरूप स्थिति वा आनंदमय अवस्था आहे. परंतु जन्मोजन्मींच्या संस्काराने वा स्मृतींमुळे जीव त्या त्या विषयांकडे, व ते ते विषय पुरविणाऱ्या पदार्थांकडे आकृष्ट होतो. यालाच बहिर्मुख होणे असे म्हणतात. त्यामुळे जीव, ते ते विषयसुख देणारे पदार्थांचे चिंतन व ते मिळविण्याची धडपड करतो व आपल्या मूळ स्वरूप वा ब्रह्मस्थितिपासून दुरावतो.
पदार्थसेवनाने आनंद लाभतो हा भ्रम आहे हे स्पष्ट करायचे झाल्यास एक साधेसे उदाहरण पुरेसे आहे. जर एखाद्यास श्रीखंड प्रिय असेल, तर ते खाल्याने त्यास आनंद लाभतो. पण ते ठराविक प्रमाणाबाहेर सेवन करू शकत नाही, तसे केल्यास त्याचा वीट येतो. तोच पदार्थ मग आनंदाऐवजी दु:खासच कारण ठरतो. हे जसे रस-विषय संदर्भात सत्य आहे, त्याप्रकारे पंचविषयापैकी प्रत्येक विषयास लागू आहे.
संपूर्ण परमार्थ हा केवळ अभाव व प्राप्ति या दोन कल्पनांशी निगडित आहे. कल्पना म्हणण्याचे कारण मूलत: येथे अभाव नाही व प्राप्ति सुद्धा नाही!!
प्रश्न: ब्रह्मानुसंधानात मन कसे एकाग्र करायचे?
यासाठी संतांनी नाम वा ध्यान आदी साधने सांगितली आहेत. हे सर्व एकाग्रता, अर्थातच मन अनेक विषयांवरून वा विचारांवरून एका विचारावर आणणे व स्थिर करणे यासाठीच केवळ आहे. समर्पणवृत्तीने कोणतेही कर्म वा सेवा करतानाही मन एकाग्र होते. विषयसेवन करतानाही मन एकाग्र होते (नाहीतर त्यातून आनंद प्राप्त होऊच शकत नाही). असो, साधक एकाग्र, निर्विचार व निर्विषय अशा क्रमाने अवस्थांतर होत होत मनाचे सर्व व्यापार सरून स्व-स्वरूपापर्यंत पोहोचतो. संपूर्ण परमार्थाचे उद्दिष्ट म्हणजे स्व-स्वरूपानुभव वा परमात्मदर्शन म्हणून जे काही संबोधिले जाते, त्याचे प्राप्तीच्या मार्गाचे वर्णन श्री समर्थ रामदासस्वामींनी मनाच्या लोकांत विविध ठिकाणी केलेले आहे.
मनाचा स्वभाव लक्षात घेऊन समर्थांनी कल्पनेवरही घाला घातला आहे.
साधकाने कैसे करावे यावर श्री समर्थ सांगतात,
त्या परमात्म्याचे वर्णन करताना श्री समर्थ सांगतात,
या सर्व मार्गक्रमणात श्री सद्गुरुंचे सहाय्यावीण अनुभूति नाही. श्री समर्थ सांगतात,
अशा या परमात्मप्राप्तीअंती काय होते? श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात ...
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
— कृष्णदास (०७.०५.२०१४)
॥ मौक्तिक माला विलसित मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆