ॐ
॥ जोगन विठामाई ॥
जोगन विठामाई
ॐ
- गुरुभक्ति, गुरुसेवा, गुरुआज्ञा प्रमाण
- मूर्तिमंत रुप याचे श्री विठामाई जोगन
- निंबपर्णे रसपान अन् अंगी केवळ कौपीन
- तपस्या खडतर अति तीव्र नाथांसमजाण
- वीणा घेऊनि हाती केले रात्रंदिन भजन
- तोषविले यति गोरखनाथांचे मन
- नृसिंहमुनि अन् गोरखजतीची केली कृपा संपादन
- लाभले तयांचे श्री माईसी पूर्ण आशीर्वचन
- अति उग्ररुप ते शिवगोरक्ष यति जाण
- भक्तिप्रेमे निववुनि दिधले दिनानाथ अभिधान
- गुरुप्रतिपदे प्रतिवर्षी वारी गाणगापूर भवन
- स्वामीस्वरुपी मिळाली जोगन होता देहपतन
- रुप दिसे माईचे नेत्री अति भेदकपण
- परी अंतरी जाणवे माऊलीसम कोमल हृदय करुण
- कोऱ्हाळे ग्रामींची जोगन ना रे तिजसम दुजी आन
- मुखेडग्रामी दरबारी दर्शना धावतसे मन
- श्री गुरुप्रेमामृत वाचिता चरित्र कळतसे माईचे थोरपण
- साष्टांग नमुनि कृष्णदास याचितो माईसी श्रीगुरुकृपाधन
✦ ✦ ✦
॥ षडरिपुनाशक हारक भवभीती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆