[ मूळ ग्रंथ:- श्रीकृष्णविजय, लेखक:- कै. गणेश नारायण मुजुमदार, संकलन:- कृष्णदास ]
गळा शोभती हार ते मौक्तिकांचे । धरू ध्यान सिंहासनस्थ प्रभुचे ॥
जया वर्णिता शेष मौनेचि राहे । गुरुकृष्णपायी वसो धी स्थिरा हे ॥
श्रीक्षेत्र करवीरनिवासी दत्तावतार स्वामी श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे एकनिष्ठ शिष्य कै. गणेश नारायण मुजुमदार यांनी श्रींचे सगुण लीलांचे पद्यचरित्र लेखनाद्वारे श्रींचे शिष्य व भक्तगणांस अत्यंत उपकृत केलेले आहे. हे गद्यचरित्र दोन खंडात असून श्रीकृष्णविजय या प्रथम खंडात प्रामुख्याने श्रींचे जन्मापासून ते महासमाधीपर्यन्तचे लीलावर्णन आढळते. यांत तीस अध्याय आहेत. द्वितीय खंड म्हणजेच श्रीकृष्णसरस्वती विजय या उत्तर-चरित्र लेखनाचा प्रारंभ प्रथम खंड पूर्ण झाल्यावर जवळजवळ सव्वीस वर्षांनी झालेला असून त्याची पूर्तता सोळा वर्षांनी झालेली आहे. या खंडात पंचवीस अध्याय आहेत. प्रथम खंडात श्रींचे चमत्कारांचे वर्णन प्रामुख्याने आढळते, परंतु उत्तर-चरित्रात मात्र श्रींचे सगुण लीलांसोबत एका परिपक्व भक्तसाधकाचे दृष्टीतून केलेले बोधदिग्दर्शन आढळते. त्याकारणाने श्रींचे हे उत्तर-चरित्र साधकीय जीवनात अत्यंत चिंतनीय व मार्गदर्शक आहे. यातील निवडक चिंतनीय ओव्या एकत्रित करून केलेले हे ‘श्रीकृष्णसरस्वती विजय सारामृत' साधकांस नक्कीच उपयुक्त वाटेल आणि सद्गुरु अन् साधनेप्रति दृढ निष्ठा व आत्मबल प्रदान करून अंतिम ध्येयप्राप्तीस खचितच सहायक होईल.
-- कृष्णदास (श्रीगुरुपैोर्णिमा २-७-२००४)
॥ सिंहासनीस्थित वामन मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆ ⬆