🏠 स्वगृह
›
संत दालन
›
परमपूज्य बाबा बेलसरे
ॐ
- रविवारी नित्य आठवण साची, होते हो बेलसरे बाबांची,
- ‘कृष्ण-कुंजी’ चा अभिनव सोहळा, भक्तीचा फुलतसे मळा,
- चैतन्याचा हा मळा, संत साहित्याचा सगळा,
- ब्रम्हचैतन्याने शिंपला , बाबा रूपे सर्वांगे बहरला,
- गहन प्रमेये आणि सिद्धांत, सहज समजाविती नित्य अनंत,
- बाबांची ती रसाळ वाणी, ऐकता श्रोतृवृंदाची न पुरती धणी,
- जणु मधु-मधुर पदार्थ पाहता, मुखासी सुटते अखंड पाणी,
- नामाची हो पटविण्या महती, ब्रम्हचैतन्ये धाडिले जगती,
- संसारी वसला हा जो यति, ज्ञानाच्या त्या नाही तो मिती,
- शुभ्र धोतर वरती सदरा, ब्रम्हचैतन्यासी जोडीले ज्याने कर,
- आशीर्वाद त्यांचा घेऊ त्वरा करा,
- आशीर्वाद त्यांचा घेऊ त्वरा करा,
- असे आमचे बाबा, प्रसिद्धी पराड्मुख, जरि होते आत्मज्ञानी संत,
- शताब्दि सोहळ्या नमुनि त्यांना, घेऊ आशीर्वाद अनंत,
- घेऊ आशीर्वाद अनंत,
कृष्णदास
✦ ✦ ✦
My Website
॥ सिंहासनीस्थित वामन मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆