श्रीसद्गुरूप्रेमरस
नाही नाही नाही देवा नाही दुजी आस
देई देई देवा मज तव प्रेमरस
तुजसाठी केला पहा संसाराचा नाश
लौकिकाची सारी पहा सोडलीसे आस
सोऽहं श्वास घेतो परी ना जाई गगनास
अहम् भाव काही केल्या ना जाई विलयास
मिटवोनि टाकी देवा सारा द्वैताभास
अद्वैतावरील भक्तीची एक कृष्णदासा आस
देई देई देवा मज तव प्रेमरस
तुजसाठी केला पहा संसाराचा नाश
लौकिकाची सारी पहा सोडलीसे आस
सोऽहं श्वास घेतो परी ना जाई गगनास
अहम् भाव काही केल्या ना जाई विलयास
मिटवोनि टाकी देवा सारा द्वैताभास
अद्वैतावरील भक्तीची एक कृष्णदासा आस
******
सद्गुरुप्रेमरस, नाहीऽऽ जीवा दुजी आसऽऽ
सद्गुरुदर्शनाचा ध्यासऽऽ, मजऽऽ लागो दो नयनासऽऽ
सद्गुरुचरण स्पर्शासऽऽ, उतावीळ या कायेसऽऽ
कर्ण उतावीळ नित्यासऽऽ, सद्गुरुऽऽ मंजुळ वाणीसऽऽ
सद्गुरु अवीट नामासऽऽ, चाखायाऽऽ जिव्हेसी या आसऽऽ
घ्राणी चालावा अखंडऽऽ, सद्गुरुंचाचि सोऽहं श्वासऽऽ
पिउनि प्रेमरस ऐसा, लागोऽऽ सद्गुरुचाचि ध्यासऽऽ
कृष्ण सरस्वती दत्तासऽऽ, विनवितो कृष्णदासऽऽ
सद्गुरुदर्शनाचा ध्यासऽऽ, मजऽऽ लागो दो नयनासऽऽ
सद्गुरुचरण स्पर्शासऽऽ, उतावीळ या कायेसऽऽ
कर्ण उतावीळ नित्यासऽऽ, सद्गुरुऽऽ मंजुळ वाणीसऽऽ
सद्गुरु अवीट नामासऽऽ, चाखायाऽऽ जिव्हेसी या आसऽऽ
घ्राणी चालावा अखंडऽऽ, सद्गुरुंचाचि सोऽहं श्वासऽऽ
पिउनि प्रेमरस ऐसा, लागोऽऽ सद्गुरुचाचि ध्यासऽऽ
कृष्ण सरस्वती दत्तासऽऽ, विनवितो कृष्णदासऽऽ
******
सद्गुरुमाये पाजिता प्रेमरस
विसरला जीव विषयरस
दृष्टीपुढे माय ना देखे आणिकास
स्थितिस या पावला आज कृष्णदास
विसरला जीव विषयरस
दृष्टीपुढे माय ना देखे आणिकास
स्थितिस या पावला आज कृष्णदास
******
सद्गुरुप्रेमरस गोडी वर्णू काय
पिता पिता प्रेमभावे देहभाव जाय
वृत्ती शमुनिया एकाकार होय
कृष्णदास दृष्टीपुढे नित सद्गुरुमाय
पिता पिता प्रेमभावे देहभाव जाय
वृत्ती शमुनिया एकाकार होय
कृष्णदास दृष्टीपुढे नित सद्गुरुमाय
******
सद्गुरुप्रेमरस, कैसा रस असे खास
नाही स्थूल रुप त्यास परी, गोडी कळे सर्वांगास
पंचज्ञानेंद्रियासी, नुरे इतर काही ध्यास
पिता रस घेतला त्याने, कृष्णदासाचाचि घास!
नाही स्थूल रुप त्यास परी, गोडी कळे सर्वांगास
पंचज्ञानेंद्रियासी, नुरे इतर काही ध्यास
पिता रस घेतला त्याने, कृष्णदासाचाचि घास!
******
सद्गुरुप्रेमरस, पिण्या जरी होई आस
गोडी तिची संसाराचा, करी सर्वथाचि विनाश
तोडोनिया विषयफास, स्वरुपाचा लावी ध्यास
करे अहंचा विनाश, सेवणारा होई बेहोश
पिऊनिया प्रेमरस, कृष्णदास मदहोश!
गोडी तिची संसाराचा, करी सर्वथाचि विनाश
तोडोनिया विषयफास, स्वरुपाचा लावी ध्यास
करे अहंचा विनाश, सेवणारा होई बेहोश
पिऊनिया प्रेमरस, कृष्णदास मदहोश!
******
सद्गुरुप्रेमरस, लक्षण त्याचे असे खास
पितो जरी दास, हर्ष होतो सद्गुरुस
करमेना एकल्यास, म्हणुनि झाला द्वैताभास
स्वत:सीच भेटण्यासी, स्वत:लाच आस
द्वैतातेत्या मिटविण्या, पान्हा फुटे सद्गुरुस
दासासी त्या पाजितसे, थोडा थोडा प्रेमरस
सेविता तो हळूहळू, भिने दासा सर्वांगास
द्वैतातुनि नेतसेतो,गुरु-दासा अद्वैतास
प्रेमरस गुरुपूर्ण, दास पूर्णप्रेमरस
रसानेच सेवावा रस, ऐसी घडे क्रीडा खास
रमता रमता या क्रीडेस, मूक झाला कृष्णदास!
पितो जरी दास, हर्ष होतो सद्गुरुस
करमेना एकल्यास, म्हणुनि झाला द्वैताभास
स्वत:सीच भेटण्यासी, स्वत:लाच आस
द्वैतातेत्या मिटविण्या, पान्हा फुटे सद्गुरुस
दासासी त्या पाजितसे, थोडा थोडा प्रेमरस
सेविता तो हळूहळू, भिने दासा सर्वांगास
द्वैतातुनि नेतसेतो,गुरु-दासा अद्वैतास
प्रेमरस गुरुपूर्ण, दास पूर्णप्रेमरस
रसानेच सेवावा रस, ऐसी घडे क्रीडा खास
रमता रमता या क्रीडेस, मूक झाला कृष्णदास!
******
सद्गुरुप्रेमरस, पिऊनिया झालो धुंद
वर्तता मी जनी वनी, अखंडचि हो आनंद
हृदयी मज सद्गुरुने, रोविलासे जो कृपाकंद
उमलोनि व्यापुनिया, राहिलासे तो सर्वांग
पाझरतो त्यातुनिया, प्रेमरस अविरत
कृष्णदास सेवितसे, राही त्यातचि डुंबत
वर्तता मी जनी वनी, अखंडचि हो आनंद
हृदयी मज सद्गुरुने, रोविलासे जो कृपाकंद
उमलोनि व्यापुनिया, राहिलासे तो सर्वांग
पाझरतो त्यातुनिया, प्रेमरस अविरत
कृष्णदास सेवितसे, राही त्यातचि डुंबत
******
सद्गुरुप्रेमरस, त्याची गोडी अति खास
कोण विचारतो शक्तीस, सेविता परमरसास
शक्ती मागे ‘स्व’ भानास, पिता झाले जे नि:शेष
नाही शक्तीची ती आस, प्रेममग्न कृष्णदास
कोण विचारतो शक्तीस, सेविता परमरसास
शक्ती मागे ‘स्व’ भानास, पिता झाले जे नि:शेष
नाही शक्तीची ती आस, प्रेममग्न कृष्णदास
******
सद्गुरुप्रेमरस गोडी, सेवी तू आवडी, जीवा सेवी तू आवडी
सुखे सर्वचि थोकडी, त्यापुढे सर्वचि थोकडी
ना वर्णिता ये गोडी, ना अमृत त्या तोडी
तुटे जन्ममरण बेडी, करी जीवासी ती वेडी
कृष्णदास चाखितसे, आवडी ती गोडी
सुखे सर्वचि थोकडी, त्यापुढे सर्वचि थोकडी
ना वर्णिता ये गोडी, ना अमृत त्या तोडी
तुटे जन्ममरण बेडी, करी जीवासी ती वेडी
कृष्णदास चाखितसे, आवडी ती गोडी
******
पहा अमुच्या पावसी कैसा मिळे प्रेमरस
काय गोडी वर्णू त्याची ना शब्द वर्णायास
सेविताचि नुरे काही मनासी या आस
प्रेमधुंदी चढोनिया विरे जगद्भास
देव तोचि तोचि भक्त येई अनुभवास
स्वरुपासी मिठी देता सद्गदित कृष्णदास!
काय गोडी वर्णू त्याची ना शब्द वर्णायास
सेविताचि नुरे काही मनासी या आस
प्रेमधुंदी चढोनिया विरे जगद्भास
देव तोचि तोचि भक्त येई अनुभवास
स्वरुपासी मिठी देता सद्गदित कृष्णदास!
******
सद्गुरुप्रेमरस जहर जहाल
जो पीवत एक बार होत बेहाल
मिटाकर खुद को करे खुशहाल
खुदा बनाकर छोडे ये ही सद्गुरुका कमाल
कृष्णदास पीकर हो गया मालामाल!
जो पीवत एक बार होत बेहाल
मिटाकर खुद को करे खुशहाल
खुदा बनाकर छोडे ये ही सद्गुरुका कमाल
कृष्णदास पीकर हो गया मालामाल!
******
Leave a Reply