योगानंद परमहंस
योगानंद परमहंस, क्रियायोगाचा राजहंस
कमल नयनी वेधक दृष्टी, बालवयातचि देवासाठी कष्टी
तळमळ जाणुनि युक्तेश्वर भेटी, क्रियायोगाची दीक्षा थेटी
लाहिरी अन् बाबाजी भेटी, अल्पावधितची परमेश्वर भेटी
जाणुनि आज्ञा गुरुदेवांची, करी परदेशाची वारी
पाश्यात्त्या ख्रिस्तासम वाटी, क्रिया योगाचा प्रसाद वाटी
प्रेमाचा संदेश पसरविला, प्रवचनांत त्या जगा थेटी
लिहिले योगी आत्मकथन अन्, जीवनातील वदले गोष्टी
वाचुनिया वाचक ते होती, क्रियायोगाचे उत्सुक पोटी
कार्य चालण्या पुढे अबाधित, ‘योगोदा’ संस्थापिती शेवटी
महासमाधी घेउनियाही, देह राखिला योग्यासम कांति
वर्णन करिता तन्मय झालो, वाचिता मज योगानंद भेटी
Leave a Reply