संत तुकाराम
देहूगावी संत तुकाराम, नाम गाता त्यांना ना आराम
पांडुरंग पांडुरंग, गाई त्यांचे अंग अंग
भंडाऱ्यावरची बैठक त्यांची, नामस्मरणी अखंड दंग
मनाची ती त्या रीत अभंग, स्फुरती अखंड अनंत अभंग
अभंगाची त्या गाथा, चमत्कारिक तिची कथा
रामेश्वरभट्टे ती बुडविली, इंद्रायणीने ती तारीयेली
वैराग्य असे ते आगळे, लोटवी शिवरायाचे वैभव सगळे
बाबाजी चैतन्यांचा शिष्य आगळा, कुडीसहित गेला स्वर्गी सगळा
जीवन कथा त्यांची सगळी, वारकऱ्यांची आदर्श आगळी
Leave a Reply