भक्त कबीर
काशीनिवासी भक्त कबीर, जपती नाम अयोध्यानिवासी रघुवीर
रामानंद गुरु त्यांचा, उपदेश त्या रामनामाचा
जपता नाम झाला त्यांना साक्षात्कार निर्गुणाचा
जातीने असती विणकर, विणता मुखी दोहे फार
दोह्यात त्या वर्णिलासे, निर्गुणाचा अर्थ अपार
त्याकाळचे संत सुधारक, अंधश्रद्धा उडविती सत्वर
सर्व धर्म एकचि सार, सांगती सार्या वारंवार
देहपतनी विवाद होता, देहाची फुले साचार
काशीपुरीची त्यांची समाधी, निर्गुणाचा स्पर्श करी
Leave a Reply