भगवान श्री नित्यानंद
केरळचे स्वामी नित्यानंद, स्थिति अखंड नित्यानंद
देवी भगवती वज्रेश्वरीजवळी, गणेशपुरी निवास अखंड
कैलाशकुटीरी निवास त्यांचा, वाटे शिवचि कैलाचा
वर्ण ही त्यांचा काळाकभिन्न, वाटे प्याला जणू तो पेला विषाचा
अवधूताची केवल स्थिति ती, निराकार साकारली ती
आत्मानंदी चालणे झपझप, बोलणे अति अल्प असेेचि
बाळ गोपाळ फार आवडे, संगती त्यांच्या रमती फार
आत्मानंदी अवधूत योग्या, दर्शना जमती भक्त अपार
फळा-फुलांचा ढीग समोर, करिती ना दृष्टी त्यापुढे
भक्त कल्याणा मात्र ठेवती, अविरत दृष्टी त्यांजकडे
एकचि दृष्टी पडता मात्र, शांभवी दीक्षा अर्पितसे
कूर्मदृष्टीने अखंड त्यांना, जन्मांतरी पोशितसे
देह त्यागिता जागृत अद्यापि, नमस्कारिता मज पाहतसे
अवधूताच्या ह्या शिष्याला, प्रेम अखंड अर्पितसे
******
Image फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा
Leave a Reply