अवतार श्री मेहेर बाबा
श्री मेहेर बाबा मौनी मुनी
मौनातुनी क्रांती घडविण्या, अवतार तो भारतभूमी
कृपा त्यावरी अनेक संती केली असे ती ऐका तुम्ही,
बाबाजान, साईबाबा, उपासनी, ताजुद्दीन अन् केडगावी नारायणी
साक्षात्कारे ज्ञान हे होता, घेती मौन, आज्ञा अंतरातुनी
प्रेमाचा संदेश पसरविला केवळ प्रेमळ नेत्रांतुनि
सेवा केली स्वहस्ते त्या मस्त अन् दीनदुबळ्यांची
प्रयोग केला नवजीवनाचा देण्या शिष्यांना शिकवण साची
प्रवास केला जगभर अन् जागोजागी भक्तगण हो गुणी
समाधी घेती मेहराबादी, मी नमितो त्यांसी नि:शब्दातुनि
******
Image फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा
— सर्व रचना © कृष्णदास
Leave a Reply