श्री समर्थ रामदास स्वामी

सज्जनगडी रामदास, जन्म त्यांचा धर्मसंस्थापनास
गोदावरीतीरी केले उग्र तपास, गायत्री मंत्र अनुष्ठानास
प्रभु रामचंद्र प्रत्यक्ष, गुरु लाधला उपदेशास
त्रयोदशाक्षरी मंत्र जप, संख्या तेरा कोटी खास
तपश्चर्येचे फळ लाधले, अंगी अपार सामर्थ्य साठले
महाराष्ट्र राज्य स्थापले, शिवरायास घेऊनि हाती
रचिले मनाचे श्लोकास, करिण्या उपदेश व्रात्य मनास
जगास उपदेश करण्या खास, लिहिले दासबोधास
आत्माराम सांगितला, अद्वैताच्या अनुभवास
शक्ति जागृती करण्यास, स्थापियेले अकरा मारुती
दासा वरिष्ठ असा हा रामदास, तोचि मज गुरु करवीरास!


रघुवीराचा दास, स्वामी माझा रामदास
सज्जनगडी करी निवास, स्वामी माझा रामदास
झोळी लावुनि काखेस, संचार दाही दिशेस
धर्मासी रक्षायास, झटला रात्रंदिवस
मंदिरे स्थापुनिया, हनुमंत आळवि खास
भक्ति-शक्ति महत्वास, प्रबोध समाजास
ऐसा स्वामी रामदास, भूषण महाराष्ट्रास
कृष्णदासा स्मरण खास, सावधान केला त्यास


।। श्री समर्थ रामदास नामावली ।।  PDF फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा.

सूचना: मराठी अक्षरे दिसण्याकरिता PDF फाईल प्रथम कॉम्पुटरवर save करणे व नंतर open करणे.


— सर्व रचना © कृष्णदास


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *