श्री सारदामाता

Sri-Sarada-Devi

बंगालची सारदामाता, रामकृष्णांची लीला सहचारिणी
त्यांच्या सर्व भक्तगणांची, असे ती भवतारिणी
रामकृष्ण मुखी माता माता, असे ती त्यांची काली माता
तेवि त्यांच्या भक्तगणांची, असे की ही सारदामाता
मातेहुनि प्रेम अन् छाया, वाटी ती त्यां भक्तगणा
पवित्र जीवन त्यांचे देई, आदर्श अन् स्फूर्ति नवी
आधारचि तो केवळ त्यांचा, विवेकानंद अमेरिका गाजवी
जीवन जगली साधे केवळ, पण असेचि ते दिव्य अति
बालक मी तो त्यांचे कुशीत, खेळतो मौज अति