श्री रावसाहेव सहस्त्रबुद्धे

( श्री वासुदेवानंत सरस्वती महाराज)

सहस्त्रबुद्धयांचे रावसाहेब, महाशून्यात बुडाले
रामानंदांचे परमशिष्य म्हणुनी, जगात नावाजले
लौकिकातुनी पूर्णचि बुडाले, म्हणुनी अलौकिकात बुडाले
ठाई ठाई भगवंत दर्शनी, सर्व ठिकाणी नमस्कारु लागले
समाधी जवळी सहस्त्र वर्षे, राहीन मी हे जाता वदले
दर्शना जाती भक्त ते सर्व, बाबांचा कृपाशीर्वाद लाधले
दत्तसंंप्रदायी अशा योग्यासम, कुणीही ना कधी पाहिले
दिसता अवचित सामोरी, चरणांवर त्यांसी मी नमिले
******

Image फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा