श्री जे. कृष्णमूर्ती

जे. कृष्णमूर्ती भारतभूचे तत्वज्ञानी संत,
जीवन जगण्या देती नवी दृष्टी अन् मंत्र
हास्य त्यांचे असे निखळ बालकापरी, आवडती त्यांसी बालके भारी
टापटीप शिस्त अन् नेटकेपणा, असेचि केवळ वाखाणण्यापरी
हस्तस्पर्शाने व्याधी हरवी, किमया करिती जादुपरी
कुणीही न गुरु अन् कुणीही तो चेला, मार्ग आक्रमा आपआपुला
प्रवचनांतुनी नित्य पसरविला, संदेश हा आपुला भला
वाणी न केवळ ‘परा’वाणी, ‘जागृत’ करिती श्रोतृगणी
‘केवळ’ दृष्टी अर्पिती श्रोत्यां, जीवन करण्या दिव्यगुणी
नमस्कार त्यांना कधीही नावडे, जाणुनि मी करतो मनोमनी
आशीर्वादे जीवन माझे, जगणे होते दिव्यपणी
******

Image फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा


— सर्व रचना © कृष्णदास