योगीराज श्री शामाचरण लाहिरी महाशय

शामाचरण लाहिरी, काशीपुरी निवास करी
गतजन्मीचा शिष्य जाणुनि, बाबाजी पुन्हा अंगिकारी
राणीखेती भेटी देई, क्रियायोग दीक्षा देई
प्रचंड अभ्यासाने पुन्हा, महासिद्ध अधिकारी होई
कार्य असे अद्यापि चालू, सत्साधका आधार देई
क्रियायोगाच्या या योग्या, कृष्णदासाची पायी डोई