भगवान श्री रमण महर्षि

अरुणाचलचे रमण महर्षी, नजर प्रेमळ हृदया स्पर्शी
या युगाचे मौनी ऋषी, दर्शन होता अति मी हर्षी
वस्त्रचि केवळ ते लंगोटी, शुभ्र उपरणे खांद्यावरती
सवे कमंडलु आणि काठी, अरुणाचलावरी ये जा करिती
दर्शना लोक दुरदुरुनी येती, ‘मी कोण ते शोध’ उपदेशिती
दृष्टी पडता एकचि क्षणी, अद्वैताची पटविती खूणी
जीवभाव हो त्यांचा फिटला, आत्मभावे संपूर्णचि नटला
पाहता त्यांना विचार खुंटला, आत्मभाव परी स्पर्श दाटला
अरुणाचलचा शिव तो भासला, नमन मी करिता अति मंद हासला!
******

Image फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा


‘मी कोण?, मी कोण?’, शोधा म्हणती श्री रमण ॥
विचार स्फुरती नित्य अंतरी, जाणविती ‘ज्या’ तो कोण?,
शोधा म्हणती श्री रमण ॥
उदय विश्‍व ये ‘मी’ पण स्फुरता, मावळता ‘मी’ उरतो तो कोण?,
शोधा म्हणती श्री रमण ॥
देहचि मी मी म्हणणे हे हो अज्ञान लक्षण
देह नव्हे मी शाश्‍वत आत्मा, ही ज्ञानाची खूण त्यासी,
शोधा म्हणती श्री रमण ॥
विचार स्फुरती मागोवा त्या घेता प्रतिक्षण
झरा आटता विचारा त्या येई हो मरण, नाश विचारा नाश मनाचा, उरते आत्म्याचे स्फुरण,
जाणा म्हणती श्री रमण ॥
सत्‌चित्‌सुखमय आत्मा तू गा पराशांती ठाण
देह जरी तव निराकार तू आत्मा निर्गुण
जाणा म्हणती श्री रमण ॥
श्री रमणाश्रमा भेट देता, भगवानांची दृष्टी पडता, अंगी बाणेल हो खूण, तेथ कृपेची खाण
कृष्णदास हा भेटी होता, दर्शनी आनंदा उधाण, कृपा करती श्री रमण ॥
******

Image फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा


— सर्व रचना © कृष्णदास