जोगन विठामाई

गुरुभक्ति, गुरुसेवा, गुरुआज्ञा प्रमाण
मूर्तिमंत रुप याचे श्री विठामाई जोगन
निंबपर्णे रसपान अन् अंगी केवळ कौपीन
तपस्या खडतर अति तीव्र नाथांसमजाण
वीणा घेऊनि हाती केले रात्रंदिन भजन
तोषविले यति गोरखनाथांचे मन
नृसिंहमुनि अन् गोरखजतीची केली कृपा संपादन
लाभले तयांचे श्री माईसी पूर्ण आशीर्वचन
अति उग्ररुप ते शिवगोरक्ष यति जाण
भक्तिप्रेमे निववुनि दिधले दिनानाथ अभिधान
गुरुप्रतिपदे प्रतिवर्षी वारी गाणगापूर भवन
स्वामीस्वरुपी मिळाली जोगन होता देहपतन
रुप दिसे माईचे नेत्री अति भेदकपण
परी अंतरी जाणवे माऊलीसम कोमल हृदय करुण
कोऱ्हाळे ग्रामींची जोगन ना रे तिजसम दुजी आन
मुखेडग्रामी दरबारी दर्शना धावतसे मन
श्री गुरुप्रेमामृत वाचिता चरित्र कळतसे माईचे थोरपण
साष्टांग नमुनि कृष्णदास याचितो माईसी श्रीगुरुकृपाधन
******

Image फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा


— सर्व रचना © कृष्णदास