लीला चैतन्याची

सूर्य ना मावळतो ना उगवतो…
तो आहे स्थिर! आपल्याच जागी… तळपत असतो तेवढ्याच तेजाने…
सूर्य नाही तेथे अंधार आणि सूर्य आहे तेथे प्रकाश ??
पण त्याच सूर्याकडे माध्यान्ही टक लावता… दिसतो मात्र अंधार…

दिसणे तेथे प्रकाश आणि न दिसणे तो अंधार हीच व्याख्या ??
दृष्टीहीनासी प्रकाशातही अंधार. अगदी कायमचा !!

कृष्ण विवरात जाताच प्रकाश होतो गुडूप आणि दिसतो केवळ मिट्ट अंधार!
ज्ञान आहे विश्वात काठोकाठ भरलेले पण दिसते मात्र अज्ञान. सर्वांना…
हीच लीला चैतन्याची !

कार्यासाठी ठरते कारण की कारणाने घडते कार्य?

कार्य ठरते कारण आणि कारण कार्य पण कार्यकारण भाव आहे अज्ञान !!

अस्तित्व आणि अभाव… ज्ञान आणि अज्ञान… हीच लीला चैतन्याची !!!

Chaitanyachi Leela

 


 

— सर्व रचना © कृष्णदास